→ A, C, E, G, I _ _ _ _?
B
D
J
K √
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेतील विषम संख्येच्या स्थानावर आलेल्या अक्षरांमिळून तयार झालेली आहे. यानुसार I नंतरचे पुढील अक्षर K येईल.
→ X, W, U, S, Q ........?
T
R
O √
N
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेतील इंग्रजी अक्षरमालिकेच्या उलट क्रमाचा उपयोग करण्यात आला आहे. या अक्षरमालिकेत एक अक्षर सोडून त्यानंतरचे अक्षर अशी रचना करण्यात आली आहे. अक्षररचनेनुसार Q नंतरचे पुढील अक्षर O येईल.
→AB, DE, GH, JK, MN ..........?
KL
PQ √
NP
QR
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेमध्ये इंग्रजी अक्षर जोडीने आलेले आहेत. दोन गटातील अक्षरामध्ये एका अक्षराचा फरक आहे. यानुसार पुढील अक्षराचा गट PQ येईल.
→ D, H, L, P, T .......?
U
X √
W
Z
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेमध्ये दोन अक्षरातील फरक तीनचा आहे. गटाने आलेले आहेत. यानुसार पुढील अक्षर X येईल.
→ AZ, CX, EV, GT ........?
HS
HT
IR √
IQ
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेतील इंग्रजी अक्षर खालीलप्रमाणे जोडीने आलेले आहेत.
A/Z, C/X, E/V, G/T, I/R. यानुसार उत्तर IR येईल.
→विसंगत गट ओळखा
D F H J
A C E G
S U X Z √
M O Q S
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेमध्ये प्रत्येक पदातील दोन अक्षरामध्ये एका वर्णाचा फरक आहे. हा फरक तिसर्या पदामध्ये नाही. म्हणून उत्तर S U X Z हे आहे.
→विसंगत गट ओळखा
A B Z Y
L O M N √
D E W V
J K Q P
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेतील प्रत्येक पहिल्या, तिसर्या व चवथ्यापदामध्ये Z गट तयार झाला आहे. तर दुसर्या पदामध्ये U गट तयार झाला आहे. म्हणून उत्तर L O M N हे आहे.
→ वेगळा गट ओळखा
F E G H √
L K J I
P O N M
T S R Q
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेमध्ये प्रत्येक दुसर्या, तिसर्या व चवथ्या अक्षरगटामधील अक्षरे उलटया क्रमाने आलेली आहेत. म्हणून उत्तर F E G H हे आहे.
→ विसंगत गट ओळखा
Z X W V
U S R Q √
P O M L
K J H G
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेमध्ये प्रत्येक पहिल्या, तिसर्या व चवथ्या अक्षरगटामध्ये दुसर्या व तिसर्या अक्षरात एकचा फरक आहे. हा फरक दुसर्या गटात नाही. म्हणून उत्तर U S R Q हे आहे.
→ वेगळा गट ओळखा
A B T E R
E F T E R
J I T E R √
M N T E R
स्पष्टीकरण :
वरील अक्षरमालिकेतील पहिले, दुसरे व चवथे पद एकाच सुत्राने आलेली आहेत. म्हणून उत्तर JITER हे आहे.
→ चुकीचे पद ओळखा
1. 2, 5, 10, 50, 500, 5000.
10
50
500
5000 √
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील प्रत्येक पद हे पहिल्या दोन पदाचा गुणाकार आहे. यापैकी 5000 संख्येला हे सुत्र लागू होत नाही. यामुळे उत्तर 5000 हे आहे.
→ चुकीचे पद ओळखा
306, 342, 380, 421, 462.
306
342
421 √
462
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील पदामध्ये अनुक्रमे 36 + 2, 4, 6, –, …. संख्या मिळविण्यात आली आहे. यानुसार 420 ऐवजी 421 अंक आला आहे. यामुळे 421 हे उत्तर आहे.
→ चुकीचे पद ओळखा
1, 4, 8, 9, 16, 25.
1
4
8 √
16
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील 8 वगळता इतर सर्व संख्या पूर्ण वर्ग आहेत. यामुळे 8 हे उत्तर आहे.
→ चुकीचे पद ओळखा
3, 5, 7, 9, 11, 13, 17.
5
9 √
13
17
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील 9 वगळता इतर संख्या मूळ संख्या आहेत. यामुळे 9 हे उत्तर आहे.
→ चुकीचे पद ओळखा
1, 8, 9, 27, 64, 125.
1
8
9 √
27
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील 9 वगळता इतर सर्व संख्या पूर्ण घन आहेत. यामुळे 9 हे उत्तर आहे.
→ विसंगत घटक ओळखा
63
80
199 √
122
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील पहिले, दुसरे पद व चवथ्यापदामध्ये x²-1 या सुत्राचा आधार घेण्यात आला आहे. तिसर्या पदाला हे सुत्र लागू होत नाही. यामुळे उत्तर 199 हे आहे.
→ विसंगत घटक ओळखा
11
13
17
21 √
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील पहिले, दुसरे पद व तिसरे पद या मूळ संख्या आहेत. चवथे पद ही मूळ संख्या नाही. यामुळे उत्तर 21 हे आहे.
→ विसंगत घटक ओळखा
120 √
160
180
200
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील दुसर्या, तिसर्या व चवथ्यापदामध्ये 20 चा फरक आहे. यामुळे उत्तर 120 हे आहे.
→ विसंगत घटक ओळखा
33
53
73
83 √
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील पहिल्या, दुसर्या व तिसर्या पदाच्या दोन्ही अंकाची बेरीज केल्यास ती सम येते. तर चवथ्या पदाची बेरीज विषम येते. यामुळे उत्तर 83 हे आहे.
→ विसंगत घटक ओळखा
972
633 √
522
844
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील पहिल्या, तिसर्या व चवथ्या पदाला दोनने भाग जातो. दुसर्या पदाला भाग जात नाही. यामुळे उत्तर 633 हे आहे.
→सम संबध ओळखा
4 : 64 : : 3 : ?
9
27
81 √
89
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील दुसरे पद हे पहिल्या पदाचा घन आहे. हा संबंध तिसर्या व चवथ्या पदाशी लावल्यास चवथे पद हे तिसर्या पदाचा घन यायला हवे. यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी 81 हे उत्तर येईल. यामुळे उत्तर 81 हे आहे.
→ सम संबध ओळखा
36 : 216 : : 81 : ?
512
542
632
729 √
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील पहिले पद हे 6 चा वर्ग आहे. व दुसरे पद 6 चा घन आहे. हा संबंध तिसर्या व चवथ्या पदाशी लावल्यास तिसरे पद हे 9 चा वर्ग आहे. यानुसार चवथे पद हे 9 चा घन यायला हवे. यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी 729 हे उत्तर येईल. यामुळे उत्तर 729 हे आहे.
→ सम संबध ओळखा
12 : 35 : : ? : 63
14
15
16 √
18
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील पहिले पद हे 6 ची दुप्पट आहे व दुसरे पद 6²-1 येते. हा संबंध तिसर्या व चवथ्या पदाशी लावल्यास चवथे पद 8²-1 = 63 याप्रमाणे येते. यानुसार तिसरे पद हे 8 ची दुप्पट असणार यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी 16 हे उत्तर येईल. यामुळे उत्तर 16 हे आहे.
→ सम संबध ओळखा
25 : 49 : : 121 : ?
81
100
144
169 √
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील पहिले पद हे 5 चा वर्ग आहे आणि दुसरे पद 7 चा वर्ग आहे. या दोन पदाच्या मूळ संख्येतील फरक 2 आहे. हा संबंध तिसर्या व चवथ्या पदाशी लावल्यास तिसरे पद हे 11 चा वर्ग असून चवथे पद 11+2 = 13 चा वर्ग येईल. यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी 169 हे उत्तर येईल. यामुळे उत्तर 169 हे आहे.
→ सम संबध ओळखा
9 : 729 : : 18 : ?
3285
4096
5916 √
6561
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील दुसरे पद हे पहिल्या पदाचा घन आहे. हाच संबंध तिसर्या व चवथ्या पदाशी लावल्यास चवथे पद हे तिसर्या पदाचा घन असेल म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी 5916 हे उत्तर येईल. यामुळे उत्तर 5916 हे आहे.
→ संख्या मालिका पूर्ण करा
3, 5, 7, 11, 13 ........?
15
17 √
19
यापैकी नाही
स्पष्टीकरण :
ही संख्यामालिका मूळ संख्येची तयार झालेली आहे, मूळ संख्या ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग न जाता त्याच संख्येने भाग जातो अशी संख्या. 13 नंतरची मूळ संख्या 17 आहे. यामुळे उत्तर 17 हे आहे.
→ संख्या मालिका पूर्ण करा
2, 5, 10, 17 .........?
24
25
26 √
यापैकी नाही
स्पष्टीकरण :
या संख्यामालिकेत n²+1 या सुत्राचा उपयोग करण्यात आला आहे. n = 1, 2, 3, — 17 नंतर पुढील संख्या 26 येते. यामुळे उत्तर 26 हे आहे.
→ संख्या मालिका पूर्ण करा
0, 1, 3, 6, 10 ....... 21, 28.
13
15
17 √
18
स्पष्टीकरण :
या संख्यामालिकेमध्ये x + n या सुत्राचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे 10 नंतरची संख्या 15 ही आहे. यामुळे उत्तर 17 हे आहे.
→ संख्या मालिका पूर्ण करा
7, 14, 23 ........... 47.
28
34 √
36
40
स्पष्टीकरण :
या संख्यामालिकेमध्ये n²+ विषम संख्या या सुत्राचा उपयोग करण्यात आला आहे. 2²+3 = 7, 3²+5 = 14, 4²+7 = 23, 5²+9 = 34. यामुळे उत्तर 34 हे आहे.
→ संख्या मालिका पूर्ण करा
2, 9, 28, 65, ——.
126 √
130
140
145
स्पष्टीकरण :
या संख्यामालिकेमध्ये n³+1 या सुत्राचा उपयोग करण्यात आला आहे. यानुसार रिकाम्या जागी 126 ही संख्या येते. यामुळे उत्तर 126 हे आहे.
→ एका सांकेतिक भाषेत A = 1, B = 2, C = 3 —- Z = 26, तर BEAR = ?
24118
25118 √
23118
25119
स्पष्टीकरण:
वरील उदाहरणामध्ये प्रत्येक अक्षराला इंग्रजी अक्षरमालिकेनुसार क्रमांक देण्यात आलेले आहेत.
A = 1, B = 2, C = 3 —- Z = 26, या नुसार BEAR करिता 25118 हा सांकेतिक क्रमांक येईल.
→ एका सांकेतिक लिपीत AND = 19 तर BUT = ?
52
40
43 √
45
स्पष्टीकरण:
वरील उदाहरणामध्ये प्रत्येक अक्षराला A = 1, B = 2, C = 3, —- Z = 26, या नुसार क्रमांक देण्यात आले आहेत. यानुसार AND या तीन अक्षरांच्या ठिकाणी येणार्या क्रमांकाची बेरीज केल्यास ती 19 येते. या नुसार BUT या अक्षरांच्या ठिकाणी येणार्या अक्षरांची बेरीज केल्यास ती 43 येईल.
→ एका सांकेतिक लिपीत BOARD = 2, 3, 4, 5, 6 PEN = 128, तर NABARD = ?
854361
316785
853567
842456 √
स्पष्टीकरण:
वरील उदाहरणामध्ये BOARD = 2, 3, 4, 5, 6 PEN = 128, क्रमांक देण्यात आले आहेत. या दोन्ही अक्षरगटातील क्रमांक एकत्र करून NABARD चा क्रमांक काढल्यास तो 842456 असा येईल.
→ सांकेतिक लिपीत BAD हा शब्द 14 असा लिहिला तर MAD हा शब्द कसा लिहाल:
16
36 √
45
60
स्पष्टीकरण:
वरील उदाहरणामध्ये प्रत्येक अक्षराला A = 1, B = 2, C = 3, —– Z = 25, या नुसार क्रमांक देण्यात आले आहेत. BAD या अक्षरांच्या ठिकाणी येणार्या क्रमांकाची बेरीज करून त्याला 2 ने गुणल्यास 14 येते. या नुसार MAD या अक्षरांच्या ठिकाणी येणार्या अक्षरांची बेरीज करून त्याला 2 ने गुणल्यास 36 येईल.
→ जर पुस्तकाला पेन म्हटले, पेनस खडू म्हटले, खडूस वही म्हटले, फळ्यावर लिहिण्याकरीता काय वापरतात?
पुस्तक
पेन
खडू
वही √
स्पष्टीकरण:
वरील उदाहरणामध्येखडुला वही म्हटले आहे आणि फळ्यावर लिहिण्याकरीता खडू वापरतात. यामुळे उत्तर (वही) येईल.
→ एका सांकेतिक भाषेत कावळ्यास बगळा, बगळ्यास पोपट, पोपटास कबुतर व कबुतरास मोर म्हटले तर शांततेचे प्रतीक काय?
कबुतर
मोर √
बगळा
कावळा
स्पष्टीकरण:
शांततेचे प्रतीक म्हणून कबुतर ओळखले जाते. वरील उदाहरणामध्ये कबुतराला मोर म्हटले आहे यामुळे उत्तर (मोर) येईल.
→ एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल तर वेळ कशात बघाल?
वही
पेन
घड्याळ
सायकल √
स्पष्टीकरण:
आपण वेळ बघण्याकरिता घड्याळ वापरतो. वरील उदाहरणामध्ये घड्याळला सायकल म्हटले आहे. यामुळे उत्तर (सायकल) येईल.
→ एका सांकेतिक भाषेत हवा म्हणजे पाणी, पाणी म्हणजे ढग, ढग म्हणजे आकाश, आकाश म्हणजे वारा तर पाऊस कशातून पडतो.
ढगातून
हवेतून
आकाशातून √
वार्यामधून
स्पष्टीकरण:
पाऊस ढगातून पडतो वरील उदाहरणामध्ये ढगाला आकाश म्हटले आहे. यामुळे उत्तर (आकाशातून) येईल.
→ जर फुटबॉल म्हणजे हॉकी, हॉकी म्हणजे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे बॅडमिंटन, बॅडमिंटन म्हणजे टेनिस असेल तर स्टेफी ग्राफ कोणत्या खेळाशी संबधीत आहे?
बॅडमिंटन
क्रिकेट
टेनिस
यापैकी नाही √
स्पष्टीकरण:
स्टेफी ग्राफ टेनिस खेळत असे. वरील उदाहरणामध्ये टेनिस या खेळाला कोणतेच नाव देण्यात आलेले नाही. यामुळे उत्तर (यापैकी नाही) येईल.
टीप :- उत्तराचा पर्याय या 【√】 चिन्हांने दर्शविला आहे





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!